पुणे, – खडकवासला विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांनी ५२,३२२ मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला आहे. या मतदारसंघात एकूण १४ उमेदवार उभे होते. मात्र, खरी लढत महायुतीचे तापकीर, महाआघाडीचे योगेश दोडके आणि मनसेचे मयुर वांजळे यांच्यामध्ये होती.
पहिल्या फेरीत दोडके यांना ४७०७, तापकीर यांना ४१७१ आणि वांजळे यांना २२१८ मते मिळाली. तर दुसऱ्या फेरीत दोडके १०८२१, तापकीर १०४४० आणि वांजळेंना १७२८ मते मिळाली. यामध्ये तापकीर ४२० मताने पिछाडीवर होते. तर तिसऱ्याच फेरीत तापकीर यांनी १७०५९ मते मिळवत दोडके यांची आघाडी मोडीत काढली. दहाव्या फेरीत दोडके ४७,६५९ , तापकीर ६३,१७४ आणि वांजळे यांना १४,१०२ मते मिळाली पंधराव्या फेरीत तापकीर यांना तब्बल ९९,०५० मते तर दोडकेंना ६५,४०२ मते मिळाली.
तापकीर विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना निर्णायक २३ व्या फेरीत १,५६,५५८ तर दोडके यांना १,०४,४७९ आणि वांजळेंना ३९,६२६ मते मिळाली. शेवटी अखेर शेवटच्या फेरीत १,६२,७६६ तर दोडके यांना १,१०,४५३ आणि वांजळे यांना ४२,४०८ मते मिळाली. पाोस्टल मतांसह भीमराव तापकीर यांना १,६३,१३१ मते, दोडके-१,१०,८०९ आणि वांजळे यांना ४२,८९७ मते मिळाली.