बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिचा आगामी “शाब्बास मितू’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. भारताची महिला क्रिकेट कर्णधार मिताली राजच्या बायोपिकमध्ये तापसी मितालीची भूमिका साकारत आहे.
या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. यामुळे तापसीचे खूप कौतुक केले जात आहे.हे पोस्टर तापसीने तिच्या सोशल मीडियावर शेअर करत याची माहिती दिली होती.
View this post on Instagram
यानंतर पोस्टरवर लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळत असून अनेकांनी कॉमेंट करत तापसीची स्तुती केली आहे. काही चाहत्यांनी पोस्टर री-पोस्ट करत तापसीला चित्रपटासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.तापसी पन्नूने दिल्लीतून मुंबईला येत बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडमधील एक खंबीर अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिले जाते.
तापसीने पिंक चित्रपटात एक दमदार भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिच्यासोबत छेडछाड करणाऱ्या मुलाला तिने चोख उत्तर दिले होते, पण हीच गोष्ट तिने तिच्या रिअल लाइफमध्येही केली आहे.
त्यामुळे तिचे कौतुक केले जात आहे. तापसी सध्या मिताली राजच्या बायोपिकच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. हा चित्रपट पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल ढोलकीया करत आहे.