मिशन मंगल आणि “सांड की आंख’ या लागोपाठ हिट झालेल्या सिनेमांनंतर तापसी पन्नू आता भारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप्टन मिताली राजच्या बायोपिकमध्ये काम करण्यासाठी तयारी करते आहे.
“शाबाश मितु’ असे या सिनेमाचे नाव असणार आहे. स्वतः तापसीने इन्स्टाग्रामवर या नवीन प्रोजेक्टची माहिती दिली आहे.
तिने मिताली राजच्या 37 व्या वाढदिवसानिमित्त तिला शुभेच्छाही दिल्या आहेत. तापसीसाठी हा रोल मिळणे काही सोपी गोष्ट नव्हते. या रोलसाठी आपल्याला खूप तयारी करावी लागणार असल्याचेही तापसीने म्हटले आहे.
View this post on Instagram
Coz her blessings mean the world !!! #ChandroDaadi ❤️❤️❤️❤️ @shooterdadiofficial
मितालीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतानाच तिला काय गिफ्ट द्यावे, याबाबत आपण खूप कन्फ्युज असल्याचेही तापसीने म्हटले आहे.मिताली राज ही भारतीय महिला क्रिकेट संघाची पहिली कर्णधार ठरली त्याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 वर्षांची कारकीर्दही तिने यावर्षी ऑक्टोबरमध्ये पूर्ण केली. तापसीसाठी हा दुसरा स्पोर्टस बायोपिक असणार आहे.
“सांड की आंख’मध्ये चंद्रो आणि प्रकाशी तोमर या नेमबाजांच्या बायोपिकमध्ये तिने चक्क आजीबाईचा रोल केला आहे. तिच्याबरोबर भूमी पेडणेकरही यामध्ये होती.