तापसी पन्नू बनली स्टॅन्ड अप कॉमेडियन

जॉनी लिव्हर, कपिल शर्मा आणि वीर दास यांच्यासारख्या स्टॅन्ड अप कॉमेडियननी कॉमेडी सोडून सिनेमात शिरकाव केला आहे. तर “नाम शबाना’ गर्ल तापसी पन्नूने ऍक्‍टिंग आगोदर सुरू केली आणि ती आता स्टॅन्ड अप कॉमेडी करणार आहे. आतापर्यंत हिंदी, तमिळ, तेलगू भाषांमधील 24 सिनेमांमध्ये काम केलेल्या तापसीने आपल्या करिअरचा ट्रॅक आता कॉमेडियन म्हणून आजमायचे ठरवले आहे. तापसीला नेहमीच कॉमेडी ऍक्‍टने भुरळ घातली आहे.

तिल मध्यंतरी एका शोची ऑफर आली होती. त्यात तिने 200 प्रेक्षकांच्या समोर झक्कास परफॉर्मन्स दिल. त्ने संगित्लेले जोक्‍स स्वतःच्य अनुभवांच्याच आजूबाजूला फिरणारे होते. कॅनडाचा कॉमेडियन रसेल पीटर्सच्या मुंबईतील या शो मध्ये तिने हा परफॉर्मन्स दिला होता. तिच्याबरोबर विकी कौशल, ईशान खट्टर, जान्हवी कपूर आणि शशांक खेतान देखील होते. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये तिने 15 मिनिटांचे सादरीकरण केले. या 15 मिनिटांच्या कॉमेडी ऍक्‍टसाठी ती 3 दिवस प्रॅक्‍टिस करत होती. भूमि पेडणेकरबरोबर “सांड की आंख’ आणि अक्षय कुमारबरोबर “मिशन मंगल’ हे तिचे आगामी सिनेमे असणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.