नेहा कक्कडवर तनुश्री दत्ता नाराज

तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. “मी टू’ मुव्हेमेंटला सेलिब्रिटी वर्ल्डमध्ये लोकप्रिय करण्यात सर्वाधिक आघाडीवर राहिलेली तनुश्री दत्ता आता नेहा कक्कडवर नाराज झाली आहे. एका रिऍलिटी शो स्पर्धेदरम्यान नेहा कक्कड अनु मलिकबरोबर जज बनली आहे. या मुद्दयावरून तनुश्री दत्ता आणि सोना महापात्रा दोघींनीही जोरदार आक्षेप नोंदवला आहे. अनु मलिकवर “मी टू’ मोहिमेदरम्यान सर्वाधिक आरोप झाले होते. अनु मलिकला जज म्हणून नियुक करण्यावर आक्षेप घेत तनुश्रीने सोनी चॅनेलवरही जोरदार टीकास्त्र सोडले आहे. चॅनेलला माणुसकीपेक्षा टीआरपी अधिक महत्वाचा वाटतो आहे, असे ती म्हणाली.

तनुश्रीने नाना पाटेकरांवरही शोषणाचे आरोप केले होते. त्यावरून झालेला वाद शांत होतो तोपर्यंत तनुश्रीने अनु मलिकच्या जज बनण्यावर आक्षेप घेऊन नव्याने वाद सुरू केला. या रिऍलिटी शो दरम्यान नेहा कक्कडला एका स्पर्धकाने “किस’ केले होते. त्यावरही तनुश्रीने आक्षेप घेतला. नेहा कक्कडने असे कसे काय करू दिले, असा प्रश्‍न तिने उपस्थित केला आहे. तिच्या या आरोपांना कायदेशीर उत्तर दिले जाईल, असे अनु मलिकने सोशल मिडीयावरच्या लांबलचक पोस्टमध्ये म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.