मुंबई – बॉलिवूडमधील “मी टू’ अभियानाला जोरदार पाठिंबा देणारी आणि नाना पाटेकरांवर शोषणाचे आरोप करणारी तनुश्री दत्ता आता अमेरिकेला परतली आहे. मात्र ती पुन्हा भारतात येऊन बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार “मी टू’ मोहिमेनंतर बॉलिवूडमधून अलिप्त झालेल्या तनुश्रीला भारतासह संपूर्ण जगात वेगळी ओळख मिळाली.
View this post on Instagram
तनुश्रीने नाना पाटेकरांवर शोषणाचे आरोप केल्यावर आलोक नाथ, साजिद खान, अनु मलिक, विकास बहल, राजकुमार हिरानी आणि सुभाष घई यांच्यासारख्या बड्या सेलिब्रिटींवरही लैंगिक शोषणाच्या आरोपांची रांग लागली होती. याच मुद्दयावरून तनुश्रीला बॉलिवूडमधून चित्रपटांसाठी ऑफर्स येत आहे. मात्र तिने या चित्रपटांच्या ऑफर्सपैकी निवडक दमदार स्टोरीना दाद दिली असून ती लवकरच एका दमदार भूमिकेसह बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे.