तनुश्री दत्ता देणार हॉर्वर्डमध्ये व्याख्यान

बॉलिवूडमधील “मी टू’ अभियानाला जोरदार पाठिंबा देणारी आणि नाना पाटेकरांवर शोषणाचे आरोप करणारी तनुश्री दत्ता आता अमेरिकेला परतली आहे. तनुश्रीने नाना पाटेकरांवर शोषणाचे आरोप केल्यावर आलोक नाथ, साजिद खान, अनु मलिक, विकास बहल, राजकुमार हिरानी आणि सुभाष घई यांच्यासारख्या बड्या सेलिब्रिटींवरही लैंगिक शोषणाच्या आरोपांची रांग लागली होती. याच मुद्दयावरून तनुश्रीला हॉर्वर्ड बिजनेस स्कूलमध्ये एक व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

बोस्टन मॅसेच्युसेट्‌समध्ये एका प्रतिष्ठित बिजनेस स्कूलमध्ये आपल्याला व्याख्यानासाठी बोलावले असल्याचे तिने इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. हॉर्वर्ड केनेडी स्कूलमध्ये 16 फेब्रुवारीला इंडिया कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्येच तनुश्रीला हे व्याख्यान द्यायचे आहे. तनुश्री जेंव्हा अमेरिकेत असते, तेंव्हा सोशल मिडीयावरून आपले रोकठोक विचार मांडत असते. आपल्या भाषणातून तनुश्री महिलांच्या लैंगिक शोषणाविरोधात जोरदार आवाज उठवणार आहे, असे समजते आहे. तनुश्रीला आपले म्हणणे मांडण्यासाठी मोठा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. आता तेथेही ती नाना पाटेकरांविरोधातल्या आरोपांची पुनरुक्ती करणार की काय?

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here