मुंबई- #METOO मुळे चर्चेत आलेली अभिनेत्र तनुश्री दत्ताने फिटनेसकडे प्रचंड लक्ष दिल्याचं दिसून आलं आहे. तिने आपलं वजन 15 किलोंनी कमी केलं आहे. भारतात येऊन पुन्हा एकदा सिनेसृष्टीत स्वत:ला आजमावणार आहे. तिच्या पदरात काही ऑफर्सही आहेत.
तनुश्रीने 2008 मध्ये नाना पाटेकर यांच्यावर असभ्य वर्तनाचा आरोप केला. त्यावेळी तो फार चर्चेत आला नाही. पण नंतर तिने ही इंडस्ट्री सोडली आणि ती अमेरिकेत स्थायिक झाली. #MeTooचा मुद्दा दोन वर्षांपूर्वी चर्चेत आला तेव्हा पुन्हा एकदा नाना पाटेकर यांच्यावर तनुश्रीने आरोप केले होते. त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
तनुश्री दत्ताने फेमिना मिस इंडिया युनिव्हर्स स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर मिस युनिव्हर्स स्पर्धेत अंतिम दहा स्पर्धकांमध्ये तिने बाजी मारली होती. तनुश्रीने बॉलिवूडमध्ये आल्यानंतर काही चित्रपट केले. त्यात चॉकलेट, ढोल, भागमभाग आदी चित्रपटांचा समावेश होतो.
दरम्यान, या फिटनेसवर किंवा लुकवर केलेल्या मेहनतीमुळे तनुश्री पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये जलवा करायला सज्ज झाली आहे.