पुणे – मिस इंडिया ऑर्गनायझेशनतर्फे आयोजित एफबीबी कॅम्पस प्रिन्सेस स्पर्धेत सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या तनिषा पाल या विद्यार्थिनीला “मिस पुणे 2019′ चा किताब मिळाला.
या स्पर्धा नुकत्याच पुण्यात पार पडल्या. तनिषा पाल ही सूर्यदत्ता कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, इन्फर्मेशन, रिसर्च अँड टेक्नॉलॉजीमध्ये (एससीएमआयआरटी) बीबीएच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. मिस इंडिया, मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी तनिषाला सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ ब्युटी अँड वेलनेसकडून सन 2022 पर्यंत सर्वतोपरी मदत करणार असून तिला मार्गदर्शन, प्रोत्साहन देणार असल्याचे संस्थेच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी सांगितले.
तनिषाने मिळवलेल्या यशाबद्दल सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी तनिषाचे वडील नरेंद्र पाल, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, बीएमसीसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, फर्गसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी, सांगवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पाटील, राजगड कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रसन्न देशमुख, “सूर्यदत्ता’चे कार्यकारी संचालक डॉ. शैलेश कासंडे आदी उपस्थित होते.