‘तानाजी, द अनसंग वॉरिअर’ चित्रपट होणार या दिवशी प्रदर्शित…

मुंबई – स्वराज्याच्या स्वप्नासाठी “आधी लगीन कोंढाण्याच आणि मग माझ्या रायबाचं” असे म्हणत कोंढाण्यावर जीवाची बाजी लावणाऱ्या तानाजी मालुसरे यांचा चरित्रपट येत आहे. अजय देवगणने या चित्रपटात तानाजी मालुसरे यांची मुख्य भूमिका साकारली असून, हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदार्शित होणार असल्याची माहिती अजय आणि चित्रपटाचे व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिली आहे.

स्वराज्याचा मावळा तानाजी मालुसरे यांच्या वर आधारित ‘तानाजी, द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट २७ डिसेम्बर २०१९ रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले असून मुख्य भूमिकेत अजय देवगण तर किल्लेदार उदयभानसिंह यांची भूमिका सैफ अली खानने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.