पुणे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे बडे नेते तथा माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा पुण्यामध्ये परतला असून बँकांसाठी ते चार्टर विमानाने निघाले होते. मात्र आता हे विमान पुणे विमानतळावर दाखल झाले आहे. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज यांच्यासोबत त्याचे दोन मित्र देखील होते. यादरम्यान ऋषीराज सावंत यांनी जवळपास 68 लाख रुपये खर्च केल्याचे समजते. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हा नेमका बँकॉकला कशासाठी जात होता याची चौकशी अद्याप सुरू आहे. तानाजी सावंत यांचा मुलगा सुखरूप परतला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र देखील असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.
काय होते प्रकरण?
तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत यांचे अपहरण झाल्याचा दावा केला जात होता. ऋषिकेश सावंत हे पुणे विमानतळ परिसरातून बेपत्ता झाले. त्यांचे पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीतून आलेल्या 4 जणांनी अपहरण केले. चारच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की तानाजी सावंत यांच्या मुलाला कोणीतरी घेऊन गेले आहे. त्यानंतर तातडीने यांची माहिती मिळवणे सुरू झाले. ते पुण्यावरून फ्लाईटमध्ये गेल्याची माहिती मिळाली. या संदर्भात किडनॅपिंगची एफआयआर दाखल करण्यात आली होती.
तानाजी सावंतांनी पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती –
मुलगा बेपत्ता होताच तानाजी सावंत यांनी पोलिसांसह पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना सांगितले की, हे बेपत्ता आहे की अपहरण याबद्दल आम्हाला नेमकं माहित नाही. त्याच्यासोबत जे होते ते त्याचे मित्र होते, त्याच्या गाडीतून जाण्याच्या ऐवजी त्याच्या मित्राच्या गाडीतून तो गेला. तसेच कुठे जात आहे याची माहिती मला नसल्याने मी काळजीमुळे लगेच पोलिसांना याबद्दल माहिती दिली आहे. फोन केल्याशिवाय तो कुठे जात नाही, मात्र आज तसे झाले नाही म्हणून मी पोलिसांत तक्रार दिली आहे. तसेच याबद्दल मला माहिती आमच्या चालकाकडून मिळाली की मी त्यांना विमानतळावर सोडून आलो. पण मला याची कल्पना नव्हती म्हणून मी पोलिसांशी संपर्क साधला.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत मुलाचे अपहरण झाल्याचा निनावी फोन पुणे पोलिसांच्या कंट्रोल रुमला आला. त्यानंतर पोलिसांची एकच धावपळ सुरू झाली होती. दरम्यान, आता ऋषीराज सावंत पुण्यात परतल्यानंतर पोलिस पुढील तपास करत आहेत.