ढाका – बांगलादेशचा आक्रमक फलंदाज तमीम इक्बाल याने रविवारी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. बांगलादेशने तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा चार गडी राखून पराभव केल्यानंतर या अनुभवी फलंदाजाने आपला निर्णय दिला.
तमिमने 78 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 116.96 या स्ट्राइक रेटने 1 हजार 758 धावा केल्या असून त्यात एक शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक फटकावणारा तमिम हा बांगलादेशचा एकमेव फलंदाज ठरला होता. 2016 साली टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत ओमानविरुद्ध त्याने शतकी खेळी केली होती.