चेन्नई – हवामान खात्याने तामिळनाडूमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यानंतर, राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून पावसाचा अंदाज पाहता चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना 15 ऑक्टोबर रोजी सुट्टी जाहीर केली आहे.
सोमवारी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी या जिल्ह्यांतील आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना 15 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत घरून काम करण्याची परवानगी देण्यासाठी सूचना जारी करण्याचे निर्देशही दिले आहेत, असे सरकारच्या अधिकृत पत्रकात म्हटले आहे.
तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सांगितले की, उद्या मुसळधार पावसाची शक्यता असल्याने मुख्यमंत्र्यांनी चेन्नई आणि तिरुवल्लूरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. खाजगी कंपन्यांसाठी घरून काम करण्याचे आदेश जारी केले आहेत, जेणेकरून लोकांनी प्रवास करू नये.