नवी दिल्ली- तामिळनाडू सरकारने सध्या राज्य सरकारच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन फतवा काढला आहे. राज्य सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाच्या ठिकाणी फक्त पारंपारिक कपडे परिधान करावे, असा आदेश तामिळनाडू सरकाने काढला आहे. त्यामुळे सरकारच्या या आदेशावरून वाद निर्माण झाला आहे.
तामिळनाडू सरकाने असे म्हंटले की, कामावर असताना महिला कर्मचाऱ्यांनी साडी आणि सलवार कमीज असे कपडे परिधान करावे. तर पुरुषांनी फॉर्मल शर्ट-पॅन्ट या सारखे कपडे परिधान करावे. सरकारच्या या आदेशामुळे जीन्स, टॉप आणि ट्राऊझर्स यासारखे कपडे कामावर परिधान करता येणार नाहीत.
Tamil Nadu govt issues order for all state govt staff, on attire permissible to them. States '…while in duty, saree/salwar kameez/churidaar with dupatta, for females staff&shirts with formal pants/veshti reflecting Tamil culture or any Indian traditional dress, for male staff.'
— ANI (@ANI) June 3, 2019