CM Resigns : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी डीएमके पक्षाचा पराभव झाल्यानंतर, मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांनी मंगळवारी स्टॅलिन आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती राजभवनाकडून देण्यात आली. (CM Resigns) तामिळनाडूमध्ये २३ एप्रिल रोजी पार पडलेल्या निवडणुकीत मोठा राजकीय बदल पाहायला मिळाला. अभिनेता विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके पक्षाने १०८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून झेप घेतली आहे. दुसरीकडे, स्टॅलिन यांच्या डीएमकेला ५९, तर एआयएडीएमकेला ४७ जागांवर समाधान मानावे लागले. (CM Resigns) CM Resigns : स्टॅलिन यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; ‘थलापती’ विजय यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा? राजभवनाने जारी केलेल्या निवेदनानुसार, राज्यपालांनी नवीन सरकारची स्थापना होईपर्यंत आणि पर्यायी व्यवस्था होईपर्यंत स्टॅलिन यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळण्याची विनंती केली आहे. (CM Resigns) सत्तेतून बाहेर पडल्यानंतर आता तामिळनाडूमध्ये नवीन सरकार कोणाचे आणि कसे स्थापन होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. स्टॅलिन यांच्या राजीनाम्यामुळे राज्यातील द्रविडी राजकारणातील एका पर्वाचा तूर्तास समारोप झाला आहे. (CM Resigns)