मुंबई – अभिनेत्री तमन्ना भाटियाने साऊथ सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही तिच्या उत्कृष्ट अभिनयाची जादू चालवली आहे. तमन्नाने नेहमीच सिद्ध केले आहे की ती कोणत्याही व्यक्तिरेखेशी जुळवून घेऊ शकते. चित्रपटांशिवाय तमन्नाच्या लूकनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आज जगभरातील लोक तमन्नाच्या अभिनयाला दाद देत आहेत. अशातच लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्याशी कनेक्ट राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. तमन्ना देखील या प्रकरणात तिच्या चाहत्यांना कधीही निराश करत नाही. अनेकदा ती तिच्या नव्या लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता पुन्हा एकदा या तिने आपला दमदार अभिनय दाखवला आहे.
तमन्नाने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती ब्लॅक कलरच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. येथे तिने सॅटिन ब्लॅक फ्रंट ओपन टॉप आणि सिक्वीन केलेली हाय व्हेस्ट पॅंट घातली आहे. हा लुक फ्लॉंट करत तिने कॅमेऱ्यासमोर एकाहून एक पोज दिली आहेत.
तमन्नाने तिचा लुक पूर्ण करण्यासाठी विंक आय लाइनर आणि ग्लॉसी पिंकिश मेकअप केला आहे. येथे तिने केसांची उंच पोनीटेल बनवली आहे. या लूकमध्ये तमन्ना खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. तमन्नाने हा अवतार चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सामान्य लोकांसोबतच सेलिब्रिटींनीही तमन्नावर स्तुतीसुमने उधळली आहेत.
तमन्नाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तिच्याकडे साऊथ चित्रपटांव्यतिरिक्त अनेक हिंदी प्रोजेक्ट्स आहेत. ‘बोले चुडियाँ’, ‘प्लॅन ए प्लान बी’, ‘भोले शंकर’, ‘गुरथुंडा सीताकलम’ आणि ‘दॅट इज महालक्ष्मी’ या तेलगू चित्रपटांमध्येही दिसणार आहे. लवकरच ‘बबली बाउन्सर’मध्ये दिसणार आहे.