सातारा, (प्रतिनिधी) – सातारा तालुक्यातील किडगाव येथील भैरवनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये तालुकास्तरीय कब्बडी स्पर्धा उत्साहात झाली. पाच वर्षाची चिमकुली निविता विनीत ढेंबरे हिच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. योवळी तिने केलेले भाषण उपस्थितांचे भुवया उंचावणारे ठरले.
याप्रसंगी कोल्हापूर विभागीय शारीरिक शिक्षण संघटनेचे व सातारा जिल्हा शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष आर. वाय. जाधव, क्रीडा शिक्षक तसेच स्पर्धा आयोजक महेंद्र गाढवे,सरपंच सविता रत्नदीप इंगवले, उपसरपंच संतोष इंगवले, सोसायटीचे चेअरमन व माजी उपसरपंच युवा नेते इंद्रजित ढेंबरे, माजी उपसरपंच कॅप्टन विठ्ठल इंगवले,
अशोक ढेंबरे राष्ट्रीय प्रशिक्षक सायराबानू शेख, राष्ट्रीय कबड्डीपटू व महाराष्ट्र संघाचे कर्णधार परशुभाऊ इंगवले, विद्यालयाचे प्राचार्य पावरा, क्रीडा संघटनेचे पदाधिकारी मारुती माने,
विजयराव यादव,राजेंद्र माने, पांडुरंग कणसे, लहू उर्फ यशवंत गायकवाड तसेच विविध संघाबरोबर आलेले क्रीडा शिक्षक,मार्गदर्शक तर स्पर्धा सयोजनांसाठी शिवाजी उदय मंडळाचे मान्यवर राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पंचही उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय खेळाडू रत्नदीप इंगवले, अजित इंगवले, संदीप ढेंबरे, सुजित इंगवले, हणमंत टिळेकर, प्रितेश इंगवले, प्रदीप सकुंडे,धनाजी शिंदे, आदमभाई पठाण आणि ग्रामस्थ व विविध शाळेतून आलेले खेळाडू तसेच क्रीडाशिक्षक व मार्गदर्शक यांचे सहकार्य लाभले.
व्यायामाची आवड जोपासावी
यावेळी स्पर्धेची उद्घाटक म्हणून चिमुकल्या निविताने केलेले भाषण उपस्थितांचे भुवया उंचावणारे ठरले. तिने आपल्या भाषणात विद्यार्थी, विद्यार्थिनींना उद्देशून मोबाईलच्या आहारी न जाता नियमित खेळाची, आहाराची तसेच व्यायामाची आवड जोपासावी, असे संबोधित केले.
प्रमुख पाहुण्यांचे हस्ते प्रत्यक्ष मैदानावर नारळ फोडून स्पर्धेचे उद्घाटन झाले. दिवसभर उत्तम प्रकारे स्पर्धेचे नियोजन आयोजक शाळेने तसेच शाळेला दिलेली ग्रामस्थांनी साथ ही विशेष कौतुकास्पद होती.