केजरीवाल यांची फोनवरून अखिलेश यांच्याशी चर्चा

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी दूरध्वनीवरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी चर्चा केली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांनी अवलंबायच्या रणनीतीबाबत त्यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. त्या घडामोडीच्या पार्श्‍वभूमीवर आपचे नेते संजय सिंह यांनीही लखनौमध्ये अखिलेश यांची भेट घेतली.

केंद्रात पुन्हा सरकार स्थापन करण्यापासून भाजपला रोखणे आमच्या प्राधान्यक्रमावर असल्याचे सिंह यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. याआधी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे प्रमुख एन.चंद्राबाबू नायडू यांनी केजरीवाल यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजपविरोधात एकवटण्याचे विरोधकांचे प्रयत्न सुरूच असल्याचे स्पष्ट होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)