Superstar Vijay Thalpati : साऊथ चित्रपटसृष्टीत यशस्वी घोडदोड केल्यानंतर आता सुपरस्टार थलपती विजय राजकारणात सक्रिय झाला आहे. सध्या तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याची पत्नी संगीता सोर्नालिंगम हिने त्याच्यापासून घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केल्याची चर्चा आहे. संगीता यांनी विजयचे विवाहबाह्य संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यानंतर आता अभिनेत्याचे नाव प्रसिद्ध अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिच्यासोबत जोडले जाऊ लागले आहे. या चर्चा सुरू असतानाच विजयने सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने तामिळनाडू आणि पुडुचेरीमधील बारावीच्या सार्वजनिक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पोस्टमध्ये अभिनेता काय म्हणाला? “तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये बारावीच्या सार्वजनिक परीक्षा देणाऱ्या माझ्या प्रिय लहान बंधू आणि बहिणींना शुभेच्छा…” “उद्या आनंदी समाज निर्माण करण्यास तयार असलेल्या तुम्ही सर्वांनी चिंता न करता, भीती न बाळगता आणि धैर्यानं या परीक्षा द्या… तुमच्या उच्च शिक्षणासाठी आगाऊ शुभेच्छा! फक्त चांगल्या गोष्टी घडतील! विजय निश्चित आहे! अधिकृत वेळापत्रकानुसार, टीएन एचएसई + 2 परीक्षा 2 मार्च ते 26 मार्च दरम्यान होत आहेत…” असे ट्वीट विजयने केले आहे. एकीकडे विजय त्याच्या वैयक्तिक आयुष्यात चर्चेत असून दुसरीकडे त्याने बारावीच्या विद्यार्थ्याना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, ” २०२१ मध्ये विजयचे एका महिला सह-कलाकारासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे आढळले, त्यामुळे संगीताला भावनिक आणि मानसिक त्रास झाला, जो विश्वासघात आणि वैवाहिक विश्वासाचा भंग आहे…”, असा गंभीर आरोप विजयवर करण्यात आला आहे. पीटीआयनने याबाबतचे वृत्त दिले आहे. हे आरोप घटस्फोटाच्या याचिकेत लावण्यात आले आहेत. तसेच पोटगीचीही मागणी केली आहे. தமிழ்நாடு மற்றும் புதுச்சேரியில் 12ஆம் வகுப்புப் பொதுத் தேர்வு எழுதும் என் அன்புத் தம்பிகளுக்கும் தங்கைகளுக்கும் வாழ்த்துகள். நாளைய வளமான சமுதாயத்தை உருவாக்க உள்ள நீங்கள் அனைவரும் இந்தத் தேர்வினைப் பதற்றமின்றி, அச்சமின்றி, துணிவுடன் எதிர்கொள்ளுங்கள். உயர்கல்வியில் சிறந்து… — TVK Vijay (@TVKVijayHQ) March 2, 2026 थलपती विजयचे साऊथ चित्रपटसृष्टीतील योगदान मोठे आहे. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. त्याचा शेवटचा चित्रपट ‘जन नायकन’ असून, तो रिलीज झाल्यानंतर विजय चित्रपटसृष्टीतून दूर जाणार असल्याचे त्याने स्वतः जाहीर केले आहे. तो केवळ राजकीय कारकीर्दीवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. विजय तमिळनाडू वेत्री कझगम (TVK) चे संस्थापक अध्यक्ष आहेत. येत्या काही महिन्यांत तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर निवडणुकासाठी जोरदार तयारी पक्षाकडून केली जात आहे. हेही वाचा : Ahan Pandey :सैयारा चित्रपटाच्या रिलीजनंतर अहानवर झाली होती शस्त्रक्रिया; खुलासा करत म्हणाला “बराच वेळ…”