चेन्नई -आयपीएल हंगामामधील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला गेला. या सामन्यावेळी मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माने एका वेगळ्याच गोष्टीमुळे सर्वांचे लक्ष वेधले होते. ते म्हणजे, त्याने एक शिंगी गेंड्याचे चित्र असलेले शूज घातले होते.
त्याने हे शुज गेंड्यांची ही प्रजाती कमी होत असल्यामुळे त्यांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी जनजागृती करण्याच्या हेतूने घातले होते. त्याच्या शुजवर “गेंड्यांना वाचवा’ सेव्ह द रायनो असा संदेशही लिहिण्यात आला होता. याबद्दल रोहितने सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे.
रोहितने ट्विटमध्ये लिहिले की, शुक्रवारचा सामना हा खेळापेक्षा माझ्यासाठी अधिक होता. क्रिकेट खेळणे हे माझ्यासाठी एक स्वप्न होते आणि जगातील काही गोष्टींचे जतन करणे माझे कर्तव्य, जे की आपण सर्वांनी मिळून करायला हवे आहे.
हे माझ्यासाठी खास होते कारण की मैदानावर जतन करणारी वस्तू हृदयाच्या जवळ असावी आणि मी त्या गोष्टीवर प्रेम करेल. मी त्या वेळी टाकलेले प्रत्येक पाऊल महत्त्वाचे होते.’ असे त्याने लिहिले आहे.