चर्चा तर होणारच…! उदयनराजे भोसले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात भेट ;तर्क वितर्कांना उधाण

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यावरून राजकारण वेगळे वळण घेताना दिसत आहे. अशीच एक घटना आज राज्यात घडली आहे. त्यामुळे वेगवेळ्या चर्चांना उधाण येण्यास सुरुवात झाली आहे. आज भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही भेट झाली आहे.

खासदार उदयनराजे भोसले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेचा तपशील समोर येऊ शकलेला नाही. सूत्रांकडून मिळाल्येला माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी उदयनराजे आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आले होते. तिथे त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाबाबत या भेटीमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या भेटीबाबतचा अधिकृत तपशील समोर आलेला नाही.

गेल्या काही दिवसांमध्ये उदयनराजेंनी शरद पवार तसेच काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता उदयनराजे थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याने त्यांची ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे.

साताऱ्याचे माजी खासदार आणि सध्या महाराष्ट्रातून राज्यसभेवर खासदार असलेले उदयनराजे भोसले आपल्या दिलदार स्वभावामुळे सर्वपरिचीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात गेल्यापासून काँग्रेस आघाडीच्या नेत्यांसोबतच त्यांचा वावर कमी झाला आहे. पण, मित्र बनून ते अनेकांशी आपले मैत्रीपूर्ण संबंध जपले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.