मुंबई – पर्यावरण मंत्रिपदाची धुरा स्वीकारल्यानंतर आलेला पहिला वाढदिवस जोरदार साजरा करण्याची संधी ‘आदित्य ठाकरे’ यांना आज (13 जून) होती. मात्र कोरोनाच्या संकटामुळे आदित्य यांनी साधेपणाने वाढदिवस करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, आदित्य यांच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूड अभिनेत्री ‘दिशा पटानी’ हिने खास आदित्य ठाकरे यांच्या सोबतचा फोटो शेअर करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा फोटो दिशाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
तसेच, दिशाने ट्विटर हॅण्डल वरून सुद्धा आदित्य यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी यांची मैत्री प्रचंड चर्चेत आहे.
Happiest b’day @AUThackeray stay the amazing you and keep shining 🤗❤️
— Disha Patani (@DishPatani) June 13, 2020