नवी दिल्ली – कॉंग्रेसने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 125 उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर केली. त्यात 50 महिलांचा समावेश असून उन्नावमधील सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेची माता आणि गोंड जमातीच्या उंभा गावातील जमिनीसाठी लढा देणारे रामराज गोंड यांचा त्यात समावेश आहे. शिवाय या यादीत ‘बिकिनी गर्ल’ अर्चना गौतम हिचं देखील नाव आहे.
उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून अभिनेत्री अर्चना गौतम हिला उमेदवारी दिली आहे. 26 वर्षीय माजी मिस बिकनी इंडिया अर्चना गौतमने राजकीय मैदानात प्रवेश केला आहे. काँग्रेसकडून मैदानात उतरलेल्या अर्चनाची जादू राजकीय पटलावर चालते का? हे पाहणे उत्सुकत्याचे ठरणार आहे.
अर्चना गौतमनं अभिनेता विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांच्यासोबत ग्रेट ग्रँड मस्ती चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
त्यानंतर ती श्रद्धा कपूरच्या हसिना पारकर आणि बारात कंपनी या चित्रपटात देखील दिसली होती. जंक्शन वाराणसी चित्रपटामध्ये अर्चनाने एक आयटम नंबर केला होता. तिने टी-सीरिजच्या म्युझिक व्हिडीओंमध्येही काम केले आहे.
दरम्यान, कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी असा विश्वास दर्शविला आहे की,’ 125 उमेदवारांमध्ये 40 टक्के महिला आहेत. तर 40 टक्के तरूण आहेत. या ऐतिहासिक प्रयोगाने आम्ही राज्यात नव्या स्वरूपाचे राजकारण आणू,’ असं देखील त्या म्हणाला आहे.