वॉशिंग्टन । एलियन्स किंवा उडत्या तबकड्या हा सुरुवातीपासूनच मानवांसाठी उत्सुकतेचा विषय राहिला आहे.एलियन्सबद्दल शास्त्रज्ञही अनेक दावे करत आहेत. पण एलियन्सबाबत सातत्याने बोलणे किंवा चर्चा करणे धोकादायक ठरू शकते असे शास्त्रज्ञांनीम्हटले आहे.
किंग्ज कॉलेज लंडनमधील संशोधक टोनी मिलिगन यांनी द कॉन्व्हर्सेशन या प्रख्यात नियतकालिकामध्ये याबाबत लिहिलं आहे. नवीन संशोधनानुसार एलियन्सबद्दल जास्त बोलण्यामुळे व्यापक सामाजिक समस्या निर्माण होत आहे.कारण एलियन अस्तित्त्वात असल्याचा कोणताही पुरावा आपल्याकडे नाही, असे त्यांनी म्हटले आहे
एलियन्स आपल्याला भेटायला येतील असा विचार करणं मूर्खपणाचे वाटतं. याशिवाय, तारा प्रणालींमधील अफाट अंतर लक्षात घेता, फक्त एका प्रवासात आपण त्यांच्याबाबत जाणून घेऊ हे विचित्र वाटतं. एलियन्सचे पुरावे दूरच्या ग्रहांवरून आलेल्या सिग्नल्सवरून मिळण्याची शक्यता जास्त आहे.
मिलिगन म्हणतात की, आकडेवारीप्रमाणे जवळजवळ एक चतुर्थांश अमेरिकन लोकांचा असा विश्वास आहे की त्यांनी यूएफओ पाहिला आहे. अशी प्रकरणं लोकशाही संस्थांसाठी धोकादायक ठरू शकतात.
आपल्या ग्रहाच्या पलीकडे जीवसृष्टी आहे की नाही याची पुष्टी करण्यासाठी शास्त्रज्ञांनी आता अवकाशातील खडकाच्या काही तुकड्यांचा अभ्यास केला आहे.
गेल्या शतकात बाह्य अवकाशातील ढिगाऱ्यांचे तुकडे पृथ्वीवर पडले आणि त्यात न्यूक्लिओब्स आहेत, जे आकाशगंगेच्या पलीकडे जीवन दर्शवू शकतात. शास्त्रज्ञांनी उल्कापिंडात पाच विशेष डीएनए शोधले आहेत, जे एलियनच्या अस्तित्वाकडे निर्देश करू शकतात. शास्त्रज्ञ आता खडकांमध्ये सापडलेल्या पाच प्रमुख घटकांचं विश्लेषण करत आहेत.