काबूल – अफगाणिस्तानातील शिक्षण आणि विकासासाठीच्या अनुदानासाठीची रक्कम तालिबानकडून विघातक कारणासाठी वापर केला जाणार आहे. चीनकडून ब्लोफिश ही ड्रोन विकत घेण्यासाठी तालिबान या रकमेचा वापर करण्याची शक्यता आहे. ब्लोफिश ड्रोन हे एक छोटे हेलिकॉप्टर असते. त्यातून मशिनगनच्या माध्यमातून गोळीबार करता येऊ शकतो.
मोर्टार डागले जाऊ शकतात आणि चक्क हातबॉम्बदेखील फेकले जाऊ शकतात. याशिवाय युद्धभूमीवरील कोण जिवंत आहेत आणि कोण मारले गेले आहेत, हे ओळखणारे तंत्रज्ञानही आर्टिफिशियल इंटिलिजन्सच्या माध्यमातून ब्लोफिश ड्रोनमध्ये बसवण्यात आले आहे.
ब्लोफिश ड्रोन मध्यपूर्वेत निर्यात केले गेल्यास चुकीच्या लोकांच्या हातात पडण्याचा धोका अमेरिकेच्या संरक्षण विभागाने यापूर्वीच व्यक्त केला होता. तालिबानला ही ड्रोन दहशतवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी हवी आहेत, असे चीनने अमेरिकेला सांगितले आहे. मात्र या कारणाने अमेरिकेला मूर्ख बनवले जाऊ नये, असे देखील संरक्षण विभानाने म्हटले होते.
तालिबानची ताकद वाढू दिली जाऊ नये. मात्र यासाठी चीन आणि पाकिस्तानबरोबर तणाव निर्माण होऊ नये. यासाठी चीनकडून होणाऱ्या या ड्रोन विक्रीच्या व्यवहाराला अमेरिकेकडून विरोध केला जाण्याची शक्यता असल्याचेही एका वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटले आहे. अफगाणिस्तानमध्ये अलिकडच्या काळात इस्लामिक स्टेट-खोरसानकडून काबूलमध्ये आत्मघातकी हल्ला केला गेला होता. म्हणून चीन तालिबानला दहशतवादाविरोधात लढण्यासाठी अत्याधुनिक शस्त्रे देणार आहे.