काबुल : पाकिस्तानमध्ये गेल्या वर्षी तालिबान्यांची राजवट आल्यानंतर महिलांबाबतचे कायदे अधिकच कडक करण्यात आले आहेत. याचे एक ताजे उदाहरण समोर आले आहे. एका महिलेने विवाहित पुरुषाशी संबंध ठेवून त्याच्याबरोबर पलायन केल्याच्या आरोपावरून या महिलेला दगडाने मारण्याची शिक्षा देण्यात आली होती.
शिक्षेचा हा अपमान सहन न झाल्याने या महिलेने शिक्षेला सामोरे न जाता घरातच फाशी घेऊन आत्महत्या केली. अफगाणिस्थानमधील घोर प्रांतांमध्ये ही घटना घडली आहे. या महिलेचे आणि विवाहित पुरुषाचे संबंध लक्षात आल्यानंतर आणि या महिलेने त्या पुरुषासोबत पलायन केल्याची गोष्ट समोर आल्यानंतर तालिबान्यांनी तिला सर्वांसमोर दगड मारून ठार करण्याची शिक्षा ठोठावली होती.
या प्रांतातील पोलीस प्रमुखांचे तालिबानी प्रवक्ते अब्दुल रहमान यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथे महिलांसाठी कारागृहे उपलब्ध नसल्याने अशा प्रकारच्या शिक्षा सुनावण्यात येतात. ज्या महिलांना अशा प्रकारे दगडफेकीची शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यांना चौकात बोलावले होते आणि जमावातील सर्व जण एकत्र मिळून अंगावर दगड फेकतात मरेपर्यंत महिला हे दगडफेकीचे काम चालूच राहते.
गेल्या वर्षभराच्या कालावधीध्ये तालीबानी राजवटीने महिलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जे कायदे केले आहेत त्यामध्ये ज्या महिला घरातून पळून जातील त्यांना अशाप्रकारे दगडफेकीच्या शिक्षेला किंवा चाबकाचे फटके मारण्याच्या शिक्षेला सामोरे जावे लागते. या वर्षभराच्या कालावधीमध्ये तालिबान्यांनी महिलांवर अनेक नियंत्रणे लादली असल्याने साध्या कामासाठी सुद्धा आता महिला बाहेर पडणे टाळू लागल्या आहेत.