तळेगाव ढमढेरे : मुसळधार पावसामुळे गावातील दोन्ही पुल पाण्याखाली

तळेगाव ढमढेरे(प्रतिनिधी)  : येथील वेळ नदी परिसरात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे  गावातील दोन्ही पुलावरून पाणी वाहत होते. बाजारतळात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तळेगाव ढमढेरे येथे रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बाजार मैदानातील दुकानांमध्ये पाणी शिरून लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.

गावाच्या स्मशानभूमीत पाणी शिरले होते. चालुवर्षी वेळ नदीचा पुल तीनवेळा पाण्याखाली गेला आहे. २५ वर्ष्यानंतर पुन्हा कालच्या पावसाने वेशीला पाणी लागले असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल पासून पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे सकाळी वाहतूक ठप्प झाली होती.

तळेगाव-शिक्रापूर रस्त्यावर असलेल्या फरशीचा ओढा पुलावरून पाणी वाहत होते. पुलाचा कोपरा वाहून गेला. तळेगाव-शिक्रापूर रस्ता बंद होता. वाहनचालक पर्यायी तळेगाव- एलअँडटी फाट्याच्या मार्गाचा वापर करत आहे.

वेगाच्या पावसाने नाले तुडुंब भरून वाहत होते. नाले नदीला मिळाले असल्याने नदीला पुर आला. वेळ नदीवरील पुल आणि जगताप वस्तीकडे जाणारा नवीन पुल असे दोन्ही पुल पाण्याखाली गेले होते. नदीकाठी असलेल्या परिसरात चिखलम परिस्थिती निर्माण झाली होती. विठ्ठलवाडी डॅमला पाणी आल्यामुळे वाहतूक बंद झाली होती.रात्री पाऊस सुरू होण्यापूर्वीच प्रशासनाने नागरिकांना अतिदक्षततेचा इशारा दिला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.