तळेगाव ढमढेरे- येथील ग्रामपंचायत बरखास्तीची व प्रशासक नेमण्याची लेखी मागणी शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विठ्ठल पवार, महिला आघाडी अद्यक्षा चेतना ढमढेरे यांनी पुणे जिल्हा उपकार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) चे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामविकास अधिकारी रोकडे यांची खातेनिहाय चौकशीची मागणी करण्यात आली.
रोकडे यांच्यावर झालेल्या कारवाईतील तपासासाठी तळेगाव ग्रामपंचायतमध्ये अनधिकृतरित्या येऊन जुने दप्तर तपासणी करत असल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला आहे. रोकडे व खेडेकर यांना दप्तरात हरफेरी करताना तक्रारदार पाहिले. त्यावेळी केलेल्या आरोपानंतर रोकडे हे तात्काळ ग्रामपंचायत कार्यालयातून पळून गेले. यावेळी उपस्थित ग्रामविकास अधिकारी संजय खेडकर यांना जुन्या दप्तरासहित येथील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विठ्ठल पवार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा चेतना ढमढरे, कामगार आघाडीचे हिरामण बांदल व ग्रामस्तानी रोकडे, खेडकर यांना 2015 पासुनचे दप्तरात हेराफेरी करतांना रंगेहाथ पाकडले असल्याचे सांगितले. यावर कारवाई करावी अन्यथा न्यायालयात दाद मागणार असल्याचे शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विठ्ठल पवार, महिला आघाडी अध्यक्षा चेतना ढमढेरे यांनी सांगितले.