देहरे येथील तलाठी सहा महिन्यांपासून गावाकडे फिरकलाच नाही

नगर – गेल्या सहा महिन्यापासून तलाठी देहरे गावाकडे फिरकलाच नसल्यामुळे गावातील शेतकऱ्यांचे विद्यार्थ्यांच्या तसेच नागरिकांच्या नोंदीचा प्रश्न निर्माण झाला आहे. कायमस्वरूपी तलाठी न मिळाल्याने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार अशी माहीती पंचायत समिती सदस्य व्ही. डी . काळे यांनी दिली आहे.

देहरे ( ता. नगर ) परीसरात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.पीक पाण्याखाली गेले . काही पीके जळाले . या पिकांचे सर्रास पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले. मात्र या नुकसानीची पंचनामा करण्यासाठी गावात तलाठी उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांची पंचनामे झाले नसल्याने, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.

तसेच विद्यार्थ्यांचे साठी लागणारी उत्पन्नाचे दाखले ही मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ आलेली आहेत. तसेच नागरिकांच्या घराच्या नोंदी व इतर कामेही तलाठी अभावी रखडलेले आहे. ज्या शेतकऱ्याच्या पिंकाचे पंचनामे झाले नाहीत त्याचे पंचनामे प्रशासनाने तात्काळ करून शेतक या ना नुकसान भरपाई दयावी.

या गावात नेम नुक करण्यात आलेल्या तलाठी यांना पाच सहा गावे असल्यामुळे ते कोणत्या गावात आहेत हेच समजत नाही.त्याच्या हाताखाली असणाऱ्या कर्मचाऱ्याच्या भरोवल्यावर तलाठी गावगाडा सोडून देत आहेत. गेल्या सहा महिन्यापासून या गावांमध्ये तलाठी फिरण्यास नसल्याची पंचायत समिती सदस्य व्ही.डी. काळे यांनी सांगितले. देहरे गाव मोठे असून गावची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. गावाला कायमस्वरूपी तलाठ्याची नेमनूक करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.