येरवडा – मटनामध्ये पालकची भाजी टाकली म्हणून वडिलांच्या हाताला चावा घेत व आईच्या केसांना धरुन खाली पाडणाऱ्या मुलाला येरवडा पोलिसांनी अटक केली. विजय धर्मा सनादे (वय 21, रा,शंकररव जाधव नगर, येरवडा) असे आरोपीचे नाव आहे. धर्मा सनादे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी जेवण बनविताना आरोपीच्या आईने मटनामध्ये पालकची भाजी टाकली होती. यावरुन आरोपीने आईला शिवीगाळ केली. वडिलांनी याचा जाब विचारला असता त्याने वडिलांच्या डाव्या हाताला तसेच डाव्या पायाच्या नडगीवर व पोटरीवर चावून गंभीर जखमी केले. यामुळे वडिलांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दिली. गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभिम ननवरे करीत आहेत.