कोल्हापूर(प्रतिनिधी) : सोशल मिडीयावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरुद्ध पोस्ट व्हायरल झाली आहे. ती धादांत खोटी व गैरसमज पसरवणारी आहे अशी पोस्ट पसरवून द्वेष निर्माण करणाऱ्यांचा शोध घेऊन बंदोबस्त करावा अशी मागणी कोल्हापूर भाजपच्या वतीने पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे करण्यात आली.
‘ सध्या महाराष्ट्रात असणारे महाविकास आघाडीचे सरकार सर्वच स्तरावर अपयशी झाले आहे.चंद्रकांत पाटील यांनी गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणावर सातत्याने अंकुश लावण्याच्या प्रयत्नामुळेच महाविकास आघाडीचे नेते बिथरले आहेत. पण महाराष्ट्रातील जनता इतकी सुज्ञ आहे कि तिला आता नीट समजले आहे कि, सत्तेसाठी काहीही करणारे लोक कोण आहेत.
चंद्रकांत पाटील यांच्या सारख्या प्रामाणिक नेत्यावर खोडसाळ विधान करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी निवेदनातून केली आहे. यावर पोलीस अधीक्षकांनी लवकरात लवकर शोध घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भाजपा प्र.का सदस्य महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, भाजपा संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस दिलीप मेत्रानी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, विजय आगरवाल उपस्थित होते.