पुणे – करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत लाभार्थ्यांची गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. त्यासाठी आगाऊ नोंदणी करणे आणि ज्येष्ठ नागरिकांची योग्य काळजी घेण्याबाबत सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्या. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थितीबाबत आणि त्यासंदर्भाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा खासदार सुळे यांनी आढावा घेतला.
जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत लसीकरण, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स व औषधांची उपलब्धता आदी बाबींचा आढावा घेण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात आदी उपस्थित होते.