क्रिकेटबरोबर इतरही स्पर्धा घ्याव्यात -फिरोदिया

नगर: सातत्याने गेली 9 वर्ष महावीर चषक क्रिकेट स्पर्धा होत असून, यातून अनेक चांगले खेळाडू निर्माण झालेत. क्रिकेट बरोबरच इतर खेळाच्या स्पर्धाही आता संयोजकांनी घ्याव्यात, तसेच क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून नगरच्याच नव्हे तर, जिल्ह्यातील गुणी खेळाडूना मदत करण्याचे कार्य महावीर चषक परिवाराने हाती घ्यावे, असे मत उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी केले.

आदर्श व्यापारी मंडळ व मॉर्निंग सीसी क्रिकेट क्‍लब आयोजित भगवान महावीर चषक डे नाईट क्रिकेट स्पर्धेला उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते प्रारंभ व जीतोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत अवकाशात फुगे सोडून करण्यात आले. यावेळी मर्चंट बॅंकेचे अध्यक्ष किशोर गांधी, मर्चंटचे संचालक संजय चोपडा, उद्योजक नकुल चंदे, गाल्कोचे संदेश लोढा, उद्योजक नरेंद्र बाफना, रामकृष्ण पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश चांडक, राजेंद्र चोपडा, विजय गुगळे, आनंद ऋषी हॉस्पिटलचे डॉ. आशिष भंडारी उपस्थित होते.

यावेळी जितो विजय भंडारी म्हणाले, जेथे युवा तेथे विकास व देशाचे भविष्य, नगरमध्ये सामाजिक कार्यातील युवकांचा ओघ व प्रतिसाद पाहता नगर इतरांना प्रेरणा देईल. नगरमध्ये हुशार लोक असून, आता बदलत्या काळाची पावले ओळखून जितोच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविक व स्वागत संजय चोपडा यांनी केले. गेल्या 9 वर्षापासून क्रिकेट स्पर्धा अत्यंत उत्तमरीत्या होत आहेत. या क्रिकेट स्पर्धेत 20 संघांनी सहभाग घेतला. सामाजिक बांधिलकी जोपासत गणपती बंदोवस्तातील पोलिसांना मोफत फूड पॅकेट, आनंदऋषी अपंग कल्याण केंद्रास मोफत किराणा साहित्य, वन्यप्राण्यासाठी पाणी असे विविध उपक्रमही राबविले जातात. कार्यक्रमास मर्चंट बॅंकेचे संचालक अमित मुथा, मोहन बरमेचा, कमलेश भंडारी, अर्बन बॅंकेचे संचालक शैलेश मुनोत, जैन ओसवाल पतसंस्थेचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, राजेंद्र लुनिया, जॉयचे अध्यक्ष भूषण भंडारी, बॉईजचे अध्यक्ष नवरतन डागा, सोनल चोपडा, शिरूरचे बांधकाम व्यावसायिक परेश गांधी व मान्यवर उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.