राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नगर – शहराचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांच्यावर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्याचा निषेध व्यक्त करीत हा गुन्हा मागे घ्यावा यामागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी आ.संग्राम जगताप यांच्यासह प्रा.माणिक विधाते, नगरसेवक गणेश भोसले, बाबा गाडळकर, सारंग पंधाडे, अभिजित खोसे, प्रकाश भागानगरे, संभाजी पवार, शुभम रासकर, निलेश बांगरे, अरविंद शिंदे, मनीष फुलडहाळे, ज्ञानेश्वर रासकर, गोरख पडोळे, योगेश चिपाडे आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये काही तथ्थ नाही. त्यामुळे दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे.