देहरादून : दरवर्षी उत्तराखंडमध्ये होणाऱ्या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसते. येथील महापुरात अनेकदा जीवितहानी होते. त्यामुळे, येथील पावसापूर्वी हवामान खात्याचे अलर्ट आणि पूर्वउपाययोजना महत्त्वाच्या ठरतात. यासंदर्भात येथील आपत्ती व्यवस्थापनमंत्री धनसिंह रावत यांनी केलेल्या अजब वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Any app which can help share sanity & intellect? Sharing is caring!
BJP Senior leader & Minister in Uttarakhand, Dhan Singh Rawat says he can control rainfall via an app & send rains to other states experiencing lesser rainfall. pic.twitter.com/ADsQJOEGrH
— Gaurav Pandhi (@GauravPandhi) August 30, 2021
उत्तराखंडचे आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापनमंत्री धनसिंह राव यांच एक विधान सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. त्यामध्ये, पावसासंदर्भात माहिती देताना, मंत्रीमहोदयांनी एका अॅपबद्दल सांगितले आहे. त्यामध्ये, पावसाला कमी-जास्त किंवा पुढे-मागे नेता येते, असे रावत यांनी म्हटले आहे. रावत यांच्या व्हिडिओवरुन त्यांची खिल्ली उडवण्यात येत आहे. तसेच, याप्रकारचे कुठलेही अॅप बनने शक्य नसल्याचे नेटीझन्स म्हणत आहेत.
पावसाची तीव्रता सांगणारा, हवामान खात्याचा अंदाज देणारे किंवा माहिती देणारे अॅप अस्तित्वात आहे. पण, पावसाची दिशी बदलण्याचे आणि पावसाची तीव्रता कमी करण्याचे अॅप नाही, असेही अनेकानी म्हटले आहे. भाजप नेत्यांच्या या विधानावरुन त्यांना चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे.