येडीयुरप्पांच्या ध्वनीफितीची दखल घ्या

कॉंगेसची सर्वोच्च न्यायलयाला विनंती

नवी दिल्ली : जनता दल (सं) आणि कॉंग्रेसच्या 17 आमदरांनी केलेल्या बंडखोरीचे सूत्रधार भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा होते, अशा आशयाच्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांनी केलेल्या वक्तव्याच्या ध्वनीफितीची दखल आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायलयाने घ्यावी, अशी विनंती कर्नाटक कॉंगेसने केली आहे.

दरम्यान. या प्रकरणात कर्नाटक कॉंग्रेसने सादर केलेल्या नव्या पुराव्यांबाबत नवे खंडपीठ स्थापन करण्याबाबत आपण सरन्यायधिश रंजन गोगोई यांच्याशी चर्चा करू, असे खंडपीठाचे प्रमुख न्यायधिश एन.व्ही रामन यांनी सांगितले. कर्नाटकात 15 मतदार संघात या अपात्र आमदारांना उमेदवारी देण्यास भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने विरोध होत आहे. या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांना समज देताना येडीयुरप्पा यांनी हुबळी येथील मेळाव्यात हे वक्तव्य केले.

या आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे जनता दला आणि कॉंग्रेस आघाडी सरकार कर्नाटकात कोसळले. त्यानंतर तेथे भाजपाचे सरकार आले. या बंडखोरांना मुंबईत कोणालाही न भेटता ठेवू देण्याची सुचना भाजपाचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी केली होती, असे वक्तव्य येडीयुरप्पा यांनी केले होते, असे या ध्वनीफितीतून दिसत आहे. कर्नाटकात ही ध्वनीफित मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.