काश्‍मीरातील मानवाधिकाराकडे लक्ष द्या

अमेरिकेतील चौदा खासदारांची मोदींना सुचना

वॉशिंग्टन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्‍मीरातील मानवाधिकार कायम ठेवण्याकडे लक्ष दिले पाहिजे, तसेच तेथील संपर्क यंत्रणाही त्यांनी त्वरीत खुली केली पाहिजे अशी मागणी अमेरिकेतील चौदा संसद सदस्यांनी त्यांच्याकडे केली आहे. मोदींच्या नावाने या चौदा कॉंग्रेसमननी एक निवेदन जारी केले असून त्यात त्यांनी मोदींना हे आवाहन केले आहे.
भारतातील हजारो लोकांना त्यांच्या काश्‍मीरातील कुटुंबियांशी संपर्क साधणे सध्या मुष्किल झाले आहे.

त्यामुळे त्यांना आपसात संपर्क प्रस्थापित करण्यासाठी दूरसंचार व्यवस्था त्वरीत खुली केली पाहिजे असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. भारताने जबाबदारीने नेतृत्व करून काश्‍मीरातील लोकांवरील सगळे निर्बंध उठवले पाहिजेत असे आवाहनही त्यांनी मोदींना केले आहे. भारतातील नागरीकांना जे सामान्य अधिकार आहेत तसेच अधिकार जम्मू काश्‍मीरातील नागरीकांनाही मिळाले पाहिजेत असेही या खासदारांनी म्हटले आहेत.

अमेरिकेतीलही अनेक जणांना त्यांच्या काश्‍मीरातील आप्तेष्ठांशी संपर्क साधायचा आहे. त्यामुळे हे संपर्क निर्बंधही त्वरीत उठवले पाहिजेत असे त्यांनी म्हटले आहे. काश्‍मीर हा भारताचा अंतर्गत विषय आहे पण तेथील मानवाधिकारांची आम्हाला काळजी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.