Farah Khan | कोरिओग्राफर आणि फिल्ममेकर फराह खानने एका मुलाखतीदरम्यान मोठा खुलासा केला आहे. तिने एका निर्मात्याची करोडो रुपयांची ऑफर नाकारली होती. त्या निर्मात्याने फराहला त्याच्या मुलाला ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटामध्ये कास्ट करण्यासाठी 10 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. स्टँडअप कॉमेडियन झाकीर खानच्या मुलाखतीत फराहने हा खुलासा केला आहे. तिनं त्या ऑफरला नकार देत नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा विवानला कास्ट केलं होतं.
ती म्हणाली की, ‘तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हॅप्पी न्यू इयरच्या वेळी एका निर्मात्याने मला त्याच्या मुलाला कास्ट करण्यासाठी 10 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. ‘झाशीची राणी’ असल्याने मी म्हणालो, ‘मी हे कधीच करणार नाही.’ मी चित्रपटावर अन्याय करणार नाही. शाहरुखला चित्रपटात कास्ट करण्यासाठी मी १० कोटी रुपये घेतल्याचे कळले तर? कधीही, मी असे करणार नाही. मी विवान शाहला कास्ट केले कारण मला वाटले की त्या भूमिकेसाठी तो योग्य व्यक्ती आहे.’
फराह खानच्या ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, सोनू सूद, विवान शाह आणि बोमन इराणी यांनी काम केले होते. तो ॲक्शन-कॉमेडी वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. हा चित्रपट फराहचा दिग्दर्शक म्हणून शेवटचा चित्रपट आहे. त्यानंतर अद्याप तिने कोणत्याही चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले नाही.
फराह खानने ‘मैं हूं ना’, ‘ओम शांति ओम’ आणि हॅपी न्यू ईयर या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. या तिन्ही चित्रपटांमध्ये शाहरुख खान हा मुख्य भूमिकेत होता.
हेही वाचा :
‘या’ जंगलात सापडलं लपलेलं अख्खं शहर ; माया संस्कृतीतील एका प्राचीन विशाल नगराचा शोध