महामार्गावर अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करा 

नगर – नगर-पुणे महामार्गावर केडगांव परिसरातील अनेक ठिकाणे अपघात प्रवण क्षेत्र बनली असून सातत्याने त्या ठिकाणी छोटे मोठे अपघात होत आहेत, यावर उपाययोजना म्हणून अंबिकानगर बसस्टॉप समोर, सोनेवाडी चौक, हॉटेल चंद्रगुप्त समोर, हॉटेल रंगोली समोर, पारस कंपनी गेट समोर, स्पीड ब्रेकर व झेब्रा कॉसिंग तातडीने करण्यात यावेत अशी मागणी नगरसेवक मनोज कोतकर यांनी बांधकाम विभागाकडे केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंत्यांची भेट घेवून निवेदन दिले. नगर-पुणे हा राज्य महामार्ग असुन महामार्गालगत केडगांव वेशीजवळील रस्ता हा अत्यंत अरुंद असल्यामुळे तसेच जवळच अंबिकानगर बसस्टॉप आहे. या बसस्टॉप शेजारी पोलीस चौकी व महापालिकेचे अग्निशमन केंद्र आहे. तसेच या परिसरामध्ये श्री. अंबिका विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भाग्योदय विद्यालय, जोशी हॉस्पिटल, राजमाता हॉस्पिटल, साठे हॉस्पिटल, शॉपिंग कॉम्पलेक्‍स आहेत. केडगांव व उपनगरांमध्ये रो.हौसिंग, अपार्टमेंट आहेत.

नगर पुणे महामार्गावरुन नियमितपणे विद्यार्थी व नागरीकांची मोठया प्रमाणात वर्दळ असते. महामार्गावरुन दुचाकी व चारचाकी वाहने,अवजड वाहने, बस, खाजगी वाहनांची जलद गतीने वाहतूक चालू असते.वाहन चालकांचे वेगावर नियंत्रण सुटून अनेक वेळा या रस्त्यावर अपघात होऊन अनेकांना प्राणही गमवावे लागलेले आहेत. त्यामुळे स्पीड ब्रेकर व झेब्रा कॉसिंग करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक मनोज कोतकर यांनी या निवेदनात केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.