“त्याच ठिकाणी मलादेखील नेऊन गोळी घाला…”

मृत आरोपीच्या पत्नीची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : तेलंगणची राजधानी हैदराबादमध्ये महिला डॉक्‍टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचे काल तेलंगणा पोलिसांनी एन्काऊंटर करत ठार केले होते. अधिक तपासासाठी त्यांना घटनास्थळी आणल्यानंतर त्यांनी पोलिसांवर हल्ला केला होता. तसंच त्यांनी पोलिसांच्या बंदुकाही हिसकावून घेतल्या होत्या. त्यानंतर बचावासाठी करण्यात आलेल्या गोळीबारात ते ठार झाले, अशी माहिती हैदराबाद पोलिसांकडून देण्यात आली होती. यानंतर त्यातील एका आरोपीच्या पत्नीने भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. ज्या ठिकाणी माझे पती ठार झाले त्या ठिकाणी मला नेऊन गोळी घाला, अशी प्रतिक्रिया एका आरोपीच्या पत्नीने व्यक्त केली आहे.

तर आपला मुलगा ठार झाला हे ऐकून आपल्याला धक्का बसला, अशी प्रतिक्रिया अन्य एका आरोपीच्या आईने दिली. माझ्या मुलाने जर गुन्हा केला असेल तर त्याला कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी असे त्या आरोपीच्या वडिलांनी म्हटले होते. तर आता आपल्याकडे जगण्यासाठी काहीही उरले नसून माझ्या पतीला ज्या ठिकाणी ठार केले त्याच ठिकाणी मलाही नेऊन मारा अशी प्रतिक्रिया एका आरोपीच्या पत्नीने दिली आहे. पतीला काहीही होणार नाही, तो लवकरच घरी परतेल, असं आपल्याला सांगितले होते असेही ती म्हणाली.

आपल्या मुलाने कदाचित हा गुन्हा केलाही असेल परंतु त्याचा असा अंत व्हायला नको होता. अनेक लोक बलात्कार करतात, खून करतात पण त्यांची अशी हत्या केली जात नाही, त्यांना अशी वागणूक का दिली जात नाही, असा सवाल एका आरोपीच्या वडिलांनी उपस्थित केला.

Leave A Reply

Your email address will not be published.