काश्मीरचा निर्णय जनमत चाचणीद्वारे घ्या : कमल हासन

चेन्नई – जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारताच्या सीआरपीफ जवानांवर भ्याड हल्ला केला. या आत्मघातकी हल्ल्यात जवान शहीद झाल्यानंतर संतापाची लाट देशभरात ऊसळली होती. संपूर्ण देशभरातून निषेध करण्यात येत आहे. यातच अभिनेता कमल हासन यांनी हल्ल्यानंतर एका मुलाखतीमध्ये ”पाकव्याप्त काश्मीरला ‘स्वतंत्र काश्मीर’ म्हटले आहे. तसेच काश्मीरमध्ये जनमत चाचणी घेण्यात यावी, असेही म्हटले आहे. यामुळे नवीन वाद ओढवण्याची शक्यता आहे.”

कमल हासन मुलाखतीमध्ये दरम्यान केंद्राच्या काश्मीरबाबतच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जनमत घेतल्यास काश्मीरी नागरिक भारतासोबत येऊ इच्छित असतील, पाकिस्तानमध्ये जाऊ इच्छित असतील किंवा स्वतंत्र देश म्हणून राहू इच्छित असतील, तर ते समजेल. सरकार काश्मीरमध्ये जनमत घेण्यासाठी का घाबरत आहे, असाही सवाल उपस्थित केला आहे. जर भारत स्वत:ला एक चांगला देश म्हणवत असेल तर अशा प्रकारची वागणूक देता कामा नये, असेही हासन यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.