घ्या परत ! विखेंना पाठविले दोन हजार परत

अहमदनगर : “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेले २ हजार रुपये शेतकऱ्यांना चालतात, मग भाजपचं कमळ का नको”, असं वक्तव्य करणारे खासदार सुजय विखे यांच्याविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ “हे घ्या तुमचे दोन हजार” म्हणत नगरमधील तरुणांनी खासदार विखे यांना २ हजार रुपयांचा चेक पाठवला आहे.

अहमदनगरचे पालकमंत्री आणि कर्जत जामखेड विधानसभेचे उमेदवार रॅम शिंदे यांच्या प्रचार सभेत विखेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं होत. या सभेत बोलताना विखे म्हणले होते की, ‘पालकमंत्री साहेब विरोधी उमेदवाराच्या सभेला जाणाऱ्या लोकांची यादी काढा. त्या सभेला जाणाऱ्या अनेकांच्या खात्यात मागील महिन्यात मोदींनी दोन हजार रुपये जमा केले आहेत. मोदींचे हे दोन हजार रुपये चालतात, मग त्यांचे कमळ का नको?, जर तुम्हाला कम‌ळ चालत नसेल तर ते पैसे परत करा, आम्हाला गरीबांच्या कल्याणासाठी तरी वापरता येतील,’ विखेंच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान या तरुणांनी एक निवेदनही काढले आहे. “आम्ही सुजय विखेंना दोन हजार रुपये पाठवत आहोत. त्यांनी लोणीमध्ये कमळ सोडून अन्य कुणालाही मत द्यावं”, असं आवाहन या निवेदनातून करण्यात आलं आहे.

पहा खासदार विखे नेमकं काय म्हणले होते 

विरोधकांचा प्रचार करणाऱ्यांचे शेतकरी अनुदान परत घ्या

Leave A Reply

Your email address will not be published.