लखनऊ – उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे सामूहिक बलात्कार पीडितेला मारहाण करत पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आल्याची घटना घडकी आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली असून, या मध्ये पीडित महिला ८० टक्के भाजली. नंतर तातडीने पीडित महिलेला कानपूर येथील एलएलआर रुग्णालयात हलवण्यात आले.
दरम्यान, या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.
Extremely shocked to hear that the girl who filed a rape complaint in #Unnao was set ablaze. The victim is battleing for her life. If the culprits were prosecuted in time this wouldn’t have happened. Home department of the central government should take immediate cognisance.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 5, 2019
ट्विट करून पवारांनी उन्नाव प्रकरणासंदर्भात तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, बलात्काराची तक्रार करणाऱ्या पीडित महिलेला जिवंत जाळल्याची घटना ऐकून धक्का बसल्याचे शरद पवारांनी म्हंटले आहे. पीडिता सध्या मृत्युशी झुंज देत आहे. जर आरोपींना वेळीच अटक केली असती तर ही घटना घडली नसती. केंद्रीय गृहमंत्रालयानं यासंदर्भात तातडीनं कारवाई करावी, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.
पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, एकूण सहा जणांनी मिळून हल्ला केला. यावेळी तिच्या डोक्यावर आणि गळ्यावर चाकूने वार करण्यात आले. पीडित महिला जमिनीवर पडली असता तिच्यावर केरोसिन टाकून जाळण्यात आले. यावेळी काही जणांनी पीडितेची मदत करण्यासाठी धाव घेतली. मात्र आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. स्थानिकांनी फोन करुन घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.