कोची : सोशल डिस्टन्सिंग, हॅंड वॉश आणि मास्कचा वापर याची काळजी घ्याच. करोनाला गांभीर्याने घ्या, असे आवाहन केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी केले आहे.
केंद्र सरकारने धार्मिक स्थळे, मॉल्स आणि सरकारी कार्यालये उघडण्यास परवानगी दिल्यानंतर केरळमध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शैलजा बोलत होत्या.
या विषाणूंची बाधा कोणालाही होऊ शकते. आम्ही या साथीला हलकेपणाने घेऊ शकत नाही. त्यामुळे सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे निकष काटेकोरपणे पाळावेत, असे त्यांनी सांगितले. सरकारने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन केल्यास सामूहिक संसर्गाची भीती राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.