मुंबई – राज्यात आणि देशात कोरोनाचे (Corona) रुग्ण पुन्हा वाढत आहेत. आधीच्या डेल्टा व्हेरियंटसोबत नवा ओमायक्रॉन व्हेरियंट वेगाने पसरतोय. यामध्ये लहान मुलांमध्ये अधिक लक्षणे आढळत असल्याचे दिसून आले आहे. अर्थातच, लहान मुलंही या ओमायक्रॉनच्या विळख्यात सापडली आहेत. मात्र मुलांमध्ये मोठ्या माणसांपेक्षा वेगळी लक्षणं दिसून येत असल्याचे समजते आहे.
सध्या दक्षिण आफ्रिकेतील डिस्कवरी हेल्थनं मुलांमधील ओमायक्रॉन संसर्गाचा अभ्यास केला जात आहे. त्यानुसार मुलांना नाक बंद होणं, घसा खवखवणं, कोरडा खोकला आणि पाठीचा खालचा भाग दुखणं ही सामान्य लक्षणं दिसून आली आहेत.
अमेरिकेतील लेविन चिल्ड्रन हॉस्पिटलमधील तज्ज्ञांच्या मते लहान मुलांच्या तुलनेत प्रौढांमध्ये घसा खवखवणं आणि कफ ही लक्षणं अधिक प्रमाणात दिसतात. काही वेळा मुलांना डांग्या खोकला होत असल्याचंही आढळलंय. यात श्वास घेताना घुरघुरण्यासारखा आवाज येतो.
मुलांची प्रतिकारशक्ती प्रौढांपेक्षा अधिक असली, तरी ओमायक्रॉनच्या प्रसाराचा वेग पाहता अनेक लहान मुले ह्या आजाराला बळी पडत आहेत. अशा वेळी पालकांनी सावध राहून मुलांवर वेळीच उपचार करणं आवश्यक आहे.