पुणे (प्रतिनिधी) – करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आता करोनासोबत जगावे लागेल, असे दस्तुरखुद्द डब्ल्युएचओ (WHO) ने सांगितले आहे. सध्या अन्नधान्य, किराणा, भाजीपाला, फळे या दैनदिन गरजा भागविण्यासाठी नागरिक घराबहेर पडत आहेत. मार्केट यार्डाती व्यापारी, मेडिकल दुकानातील लोक, भाजी, फळ विक्रते यांना करोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्वत:ची काळजी नागरिकांना जगावे लागणार असून, विशेषत: खरेदी करून बाहेरून आणलेले साहित्य घरात घेताना काळजी घ्यावी लागणार आहे.
मार्केट यार्डातील भुसार बाजार सुरू झाला आहे. फळ, भाजीपाला विभाग सुरू करण्यासाठी बाजार समितीने प्रयत्न सुरू केले आहेत. काही दिवसात भाजीपाला विभाग सुरू होण्याची शक्यता आहे. 31 मे रोजी लॉकडाऊन संपणार आहे. त्यानंतर बाजारपेठेत आणखी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. घाऊक बाजारातून मोठ्या प्रक्रीयेनंतर माल ग्राहकांकडे येत असतो. शेतकरी माल तोडणी करतो. त्यानंतर टेम्पो, पिकअप गाडीतून तो मार्केटला येतो. तेथे आडत्यांच्या गाळ्यावर मालाची विक्री होते. हमाल हा माल उतरत असतात.
मापाडीच्या उपस्थितीत त्यांचे वजन होते. तेथून किरकोळ व्यापारी माल खरेदी करतात. टमटम अथवा छोट्या वाहनाने नेतात. छोट्या स्टॉल, दुकानाच्या माध्यमातून त्याची विक्री करत असतात. तेथून ग्राह्क खरेदीकरून माल घेऊन येतो. या सर्व प्रक्रीयेतीला एका व्यक्तीला जरी करोनाचा संसर्ग असेल, तर परिणाम होण्याची शक्यता असते. बाहेरून घेऊन आलेल्या मालाबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. याविषयी पुणे डॉक्टर्स असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य डॉ. भारत कदम म्हणाले,
भाजी, किराणा दुकानात खरेदीसाठी गेल्यानंतर सोशल डिस्टनिंगचे पालन केले पाहिजे. घरातून सॅनिटाईज होऊन निघा. खरेदी करून आल्यानंतर संपूर्ण कपडे गरम पाण्यात धुवून स्वत: सॅनिटायझर होणे आवश्यक आहे. जेणेकरून घर, सोसायटीत कोणाला संसर्ग होणार नाही. आणलेल्या भाज्या, फळे गरम पाण्यात धुवून घेवावाती. मात्र, त्या वस्तु गरम पाण्यात ठेवू नये. ठेवल्यास त्याचा वेगळा परिणाम होण्याची शक्यता असते.
किरणा माल हा देखील काही काळ बाहेर ठेवून घरात घ्यावा. बाजारात खरेदीसाठी गेल्यावर आर्थिक व्यवहार करताना हातमोजे, हॅंडग्लोज वापरावेत. जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. त्यानंतर अंघोळ केली पाहिजे. अंघोळ शक्य नसेल तर किमान गरम पाण्याने हातपाय, चेहरा धुतला पाहिजे. गरम पाण्याने साधा घरगुती आहार, कडधान्याचा वापर असेल तर चांगलेच.