विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शाळांमध्येच कॅम्प घ्या

पुणे – शालेय विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शाळांमध्ये आधार कॅम्प घ्यावे लागणार आहेत. याबाबतचे आदेश राज्य शासनाने प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे.

केंद्र शासनाने विविध कामकाजासाठी आधार कार्ड बंधनकारक केलेले आहे. वयाची 5 ते 15 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या आधार कार्डचे अद्ययावतीकरण करणे आवश्‍यक आहे. त्याबाबती सूचनाही जारी झालेल्या आहेत. बॅंक, पोस्ट ऑफिस, बीएसएनएल या यूआयडीएआयच्या नोंदणीकृत आधारसेवा केंद्रामधून विद्यार्थ्यांचे आधार नोंदणीकरण व अद्ययावतीकरणाची कार्यवाही करावी, असे आदेश जारी झाले आहेत. अस्तित्वात असलेल्या आधारसेवा केंद्रामार्फतच आधार अपडेटची प्रक्रिया करावी लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी अपडेट करण्यासाठी योग्य ते नियोजन करण्याची आवश्‍यकता आहे.

गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांना शाळांच्या जवळ असणाऱ्या आधार सेवा केंद्रांशी संपर्क साधून शाळांमध्येत कॅम्प आयोहित करण्याच्या सूचना द्याव्यात. आधार सेवा केंद्राचा सविस्तर तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. गट शिक्षणाधिकारी यांनी शाळेमध्ये आयोजित केलेल्या आधार कॅम्पचा आढावा दर आठवड्याने घ्यावा, असे आदेश शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी जारी केले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.