पुनर्वसित जमिनी हस्तांतरण करणाऱ्यांवर कारवाई करा

रांजणगाव गणपती – शिरूर तालुक्‍यातील शेकडो एकर पुनर्वसित जमिनीचे बेकायदेशीररित्या हस्तांतरण करणाऱ्या अधिकाऱ्यांची व दलालांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी छावा संघटनेचे उपाध्यक्ष व निमगाव म्हाळुंगीचे उपसरपंच तेजस यादव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

शिरूर तालुक्‍यातील गणेगाव खालसा, निमगाव म्हाळुंगीसह अनेक गावांमधील जमिनी तत्कालीन राज्य सरकारने चासकमान, डिंभा, टेमघर धरण क्षेत्रातील बाधितांना देण्यासाठी ताब्यात घेतल्या होत्या. मात्र, आजही शिरूर तालुक्‍यातील काही राजकीय दलालांकडून जमिनी लुटल्या जात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.