मनपा मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाई करा : शेळके

नगर (प्रतिनिधी) – मनपाच्या प्रभाग 17 मधील दौंड रस्त्यावरील अजय गॅस गोडाऊन मागील रस्त्याचे शेजारील जागा मालकाने कुठली ही पूर्व सूचना न देता मनपाच्या मालकीचा रस्ता जेसीबीच्या सह्याने खोदुन महापालीकेचे आर्थिक नुकसान केले आहे. त्यामुळे या संबंधितांवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्याची मागणी महिला बाल कल्याण समितीच्या सभापती लता शेळके यांनी केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील नागरिकांना रस्त्याची सोय नसल्यामुळे पावसाळ्यात अनेक समस्यानां सामोरे जावे लगते. मनपची आर्थिक परिस्तिती बिकट असताना ही प्रभाक 17 मधील 350 मीटर रस्त्याचे मजबुती करण व डाबंरिकरनाचे काम मंजूर केले. या रास्त्याच्या विकास कामासाठी मोठा निधी प्राप्त करुण दिला. मात्र, रस्त्याच्या शेजारील जागा मालकाने कुठली ही पूर्व सूचना न देता मनपाच्या मालकिचा रस्ता जेसीबीच्या सह्याने खोदुन मनपाचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे त्यावर कारवाई करा अशी मागणी शेळके यांनी केली आहे.

यावेळी सुरेश इथापे म्हणाले, कोणी मनपाच्या मालकीचे नुकसान जाणून बुजुन करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या वर कडक कारवाई करण्यात येईल. अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. यावेळी त्यांनी ठेकेदाराला पुन्हा रस्त्याचे काम सुरु करण्याचे आदेश दिले. यावेळी श्रीकांत निंबाळकर, सुरेश शेळके आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.