नवी दिल्ली – कोरोना विषाणूमुळे जगभरात दहशत पसरली आहे. भारतातही संक्रमित लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सर्व नागरिक आपल्या घरामध्ये कैद झाले असून, वर्क फ्रॉम होम करत आहेत. या धोकादायक साथीची लागण टाळण्यासाठी वेळोवेळी गाइडलाईन्स जारी केल्या जातात. फेस मास्क लावणे आणि आपले हात धुवाने हे सर्व आता आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आहे.
कोरोनाच्या या काळात नागरिक आपल्या सोयीनुसार, आवडीनुसार मास्क तयार करत आहे. आता आणखी एका अशाच वेगळ्या मास्कचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
— Tyler Glaiel (@TylerGlaiel) May 25, 2020
अमेरिकेतील गेम डिझायनर आणि प्रोग्रामर टेलर ग्लेयल यांनी हा विशेष प्रकारचा मास्क तयार केला आहे. हा हसता बोलता मास्क कोरोना विषाणूपासून बचाव करतो. या मास्कमध्ये आत 16 एलईडी लाइट्स लावण्यात आल्यात आहे. तुमच्या तोंडाच्या हालचालीनुसार या एलईडी लाइट्सची हालचाल होते. मास्कमध्ये वॉइस पॅनेल लावण्यात आलेत जे एलईडीशी जोडण्यात आले.
तसेच, हा मास्क निर्जंतुकही करता येऊ शकतं. मास्कचं कापड आणि त्यातील एलईडी लाइटचं पॅनेल बाहेर वेगळं करता येऊ शकतं. त्यानंतर कापड धुऊन घेता येईल आणि आतील वस्तू यूव्ही लॅम्पने सनिटाइझ करता येऊ शकता, असं टेलर यांनी सांगितली. दरम्यान, या एका मास्कची किंमत जवळपास 3800 रुपये आहे.